धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कामकाजावर देखरेख करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने उमरगा व तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री.पंकज कुमार (भा.प्र.से) यांची नियुक्ती केली आहे.
निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक श्री.पंकजकुमार हे सर्व नागरिक,राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,संघटना व पत्रकार इत्यादींना भेटीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11 ते दुपारी 12 वाजता दरम्यान उपलब्ध राहणार आहे.श्री.पंकजकुमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9356217980 हा आहे.केवळ निवडणुकीशी संबंधित कामाशी त्यांना भेटता येईल.