भूम (प्रतिनिधी)- महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महायुतीची विजय संकल्प सभा पार पडली. यावेळी सर्व नेत्यांनी सावंत यांच्या विजयाचा संकल्प केला. यावेळी मंत्री सावंत यांनी विकास कामांचा लेखाजोखा मांडत हरीत, धवल व उद्योग क्रांती करण्याचा नारा दिला. येत्या 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळी, आकांक्षितपणाचा डाग पुसण्याची शपथ सावंत यांनी घेतली. 2 हजार कोटींचा निधी आपण या मतदारसंघात आणला असे सावंत यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात 4 कारखाने असुन 1 तयार होत आहे. रोजगार दिला. बचत गटाच्या माध्यमातून रोजगार दिला. त्यामुळे त्यांना 7-8 हजार महिन्याला मिळत आहेत. 2024 पर्यंत मी 24 महिने 42 निर्णय घेतले आहेत असे सावंत यांनी सांगितले. सभेला गिरीराज सावंत, धनंजय सावंत, केशव सावंत, दत्ता साळुंके, गौतम लटके, संजय गाढवे, सुभाष सिद्धीवाल, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, जाकीर सौदागर, राहुल डोके, बालाजी गुंजाळ, दत्ता साळुंके, गौतम लटके, संजय गाढवे, सुभाष सिद्धीवाल, संजय बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थितीत होते.