धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक संजय जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली  धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणे कामी  दि.04.10.2024 रोजी  रवाना  होवून  तुळजापूर ते लातुर जाणारे रोड लगत तुळजापूर बस्थानक येथे टायगर गेम नावाचे जुगार खेळत व खेळवीत असणारे इसमांची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक  पोलीस  निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके यांनी पोलीस स्टाफसह तुळजापूर ते लातुर जाणारे रोड लगत तुळजापूर बस्थानक येथे 19.30 वा.सु. छापा टाकला. तेथे टायगर गेम नावाचे जुगार खेळत असतांना खालील इसम मिळून आले. अमीर अली ईरानी, वय 33 वर्षे, आयुष सुनिल चव्हाण रा. तांबरी विभाग धाराशिव, सुरज रमेश  पवार, रा. जयसिंगपूर ता. सिरोह जि. कोल्हापूर, सादक रजा ईरानी रा. रामानंद नगर किर्लौसकरवाडी ता. पलुस जि. सांगली, मारुती बाळासाहेब जाधव रा. घाटशिळ रोड तुळजापुर, शरद सुभाष चव्हाण, रा. दिपकनगर तांडा ता. तुळजापूर, नितीन ग्यानदेव रोचकरी रा. तुळजापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव  मंगेश हे सर्व लोक टायगर गेम जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमुद इसम हे रोख रक्कम व जुगाराचे साहित्यासह एकुण 1 लाख 5 हजार 550 स्वत:चे कब्जात बाळगलेले असताना पथकास मिळून आले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि वासुदेव मोरे, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे,  पोलीस हावलदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, फराहाण पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोकॉ होळकर, चालक बोईनवाड, दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top