भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील नळी येथील तरंगे आश्रम शाळेतून बेपत्ता झालेल्या नववीत शिकणाऱ्या आशिष बाळू काळे या विद्यार्थ्यांचा मृतदेह  4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नळी वडगाव शिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांचा शोध घेऊन दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी 5 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान पाऊण तास भूम-जामखेड मार्गावरील नळी वडगाव फाटा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केल्याने आंदोलन स्थळी आंबी व भूम येथील पोलिसांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.


 
Top