तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवराञ उत्सवातील चौथ्या माळे दिनी रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी देवीदर्शनार्थ भाविकांची तुफान गर्दी झाली होती.
तिर्थक्षेत्र तुळजापूरात शनिवार रात्रीपासुनच भाविक दाखल झाले होते. हा भाविकांचा ओघ रविवार राञी पर्यत होता. आज रस्ते भाविकांच्या गर्दीने खचाखच
भरून गेले होते. आज शारदीय नवरात्रोत्सवातील शनिवार, रविवार सलग आलेल्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रविवारी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची आज प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. रविवारी पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनास आरंभ झाला. पहाटे पासुन धर्मदर्शन, पेड दर्शन, अभिषेक रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर तिर्थकुंड वाहनतळे अपुरे पडले.
मंदीर दोन्ही महाद्वारा समोर दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशा चेंगराचेंगरी सहन करीत भाविकांना येथुन बाहेर पडावे लागत होते.
तुळजापुरात चौथ्या माळेदिनी माळेला तीन लाखाचा आसपास भाविकांनी शिखर, मुख, धर्म, पेड दर्शन घेतले. रविवार सुट्टी वार असल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी भाविकांची संख्या मोठी होती. तर चालत येणाऱ्या भावीकांची संख्या ही लक्षणीय होती. दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. संध्याकाळी पुन्हा अभिषेक पूजा झाल्यानंतर मंदिर परिसरात देवीजींचा छबिना काढण्यात आला. त्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळपूजा होऊन नवरात्रोत्सवातील चौथ्या माळे दिनीच्या धार्मिक विधीचा समारोप झाला.