कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील मांजरा काठावरील स्मशान भूमीत भगवान शंकराची मूर्ती स्थापन करण्याची कल्पना पूर्णत्वास जात असून पाच फूट तीन इंच उंच भव्य दिव्य संगमरवरी ( मकरान ) पांढरा शुभ्र दगडापासून किशनगड राजस्थान येथील मूर्ती शिल्पकार अजयकुमार अहुजा हे भव्य - दिव्य अप्रतिम अशी मूर्ती बनवीत असून मूर्ती स्थापनेसाठी मांजरा काठ येथील स्मशानभूमीत जागा निश्चित करण्यात आली असू यासाठी चार फुट पाच इंच उंघचीचा चबुतरा बांधकाम करण्यात येणार आहे यासाठी लवकरच भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात येणार आहे कळंब शहरातील नागरिकांनी एकत्रीत येवुन वैकुंठ धाम येथे भगवान शंकर मुर्ती बसविण्यासाठी समीती स्थापन केली असून या कार्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे हे कार्य लोकसहभाग व लोकवाटा यातून पूर्णत्वाला जात असल्याची माहिती भगवान शंकर मूर्ती स्थापना समितीचे प्रकाश भडंगे यांनी सांगितले.