तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सिंदफळ येथे आमदारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील यांना अशोभनीय भाषा मध्ये बोलले. त्याचा मी जाहीर निषेध करतो. असे स्पष्ट करुन कृष्णा खोरे 21 टीएमसी पाणी मराठवड्यात आणण्याचे सर्व श्रेय प्रथम मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनाच असल्याचे पञकारांशी बोलताना म्हणाले.
शनिवारी सिंदफळ येथील झालेल्या वादा बाबतीत बोलताना माजीमंञी माजी आमदार मधुकर चव्हाण म्हणाले कि, मराठवाड्याच्या न्यायाचे 21टीएमसी पाणी 2007 मध्ये स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगर येथे झालेल्या मंञीमंडळ बैठकीमध्ये मंजूर केले. 19 टीएमसी धाराशिव जिल्हयासाठी 2825 कोटी त्या नंतर बिड जिल्हासह 23.66 टीएमसीला सुधारित मान्यता. खर्च 4050 कोटीला 2009 मध्ये दिली. यामध्ये साठवण बांधणे, तलावाची ऊंची वाढवणे बॅरेजेस बांधणे, कँनल खोदणे पंपहाऊस बांधणे, पाईपलाईन करणे, वीजपुरवठा करणे इ. कामे होती. या पैकी बहुतांश कामे 2014 पर्यंत
पूर्ण झाली होती. बंद पाईपलाईन व पंप हाऊस इतकीच कामे बाकी होती. परंतु मागील 10 वर्षात ही कामे झाली नाहीत. या सर्व कामासाठी मी विधीमंडामध्ये वेळोवेळी आवाज उठवला आहे. याचे इतरांना श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. याचे सर्व श्रेय स्व. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यानांच द्यावे लागेल असे शेवटी म्हणाले. यावेळी कुणाचा याला अप्रत्यक्ष विरोध होता हे सर्वाना माहीत आहे. असा गौप्य स्फोट यावेळी केला. यावेळी जि.प.माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, माजी पं. स. सभापती शिवाजी गायकवाड, युवा नेते रुषी मगर, अभिजीत चव्हाण, रवि कापसे सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थितीत होते.