धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा कुस्ती संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी आहिल्यानगर येथे 15 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमन व फ्री स्टाईल स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये धाराशिवच्या दोन महिला पैलवान पौर्णिमा प्रभाकर खरमाटे 65 किलो वजनी गटात व सृष्टी संतोषराव जमदाडे 62 किलो वजनी गटात राज्यात दुसरा क्रमांक मिळवून सिल्वर मेडलची कमाई केली. पैलवान पौर्णिमा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्गची विद्यार्थिनी व पैलवान सृष्टी ज्ञान उद्योग विद्यालय येरमाळाची विद्यार्थिनी आहे. या कुस्तीमध्ये दोघींनी आक्रमकपणे खेळाच्या जोरावर समोरील खेळाडूला चितपट करून सिल्वर पथकाचे कमाई केली आहे. या विजयाबद्दल धाराशिव शहरासह जिल्ह्याचे नावलौकिक या खेळाडूंकडून करण्यात आले आहे.
तसेच यावेळी क्रीडा शिक्षक कपिल सोनटक्के व चांदणे, जिल्हा कुस्ती संघाचे ममदादा गाते, संतोष नलावडे, संतोष जमदाडे, संदीप वांजळे, सुंदर जवळगे, उदय काकडे, जाधव दिनकर, आनंद केंद्रे, गणेश सप्ते, मनोज जाधवर, रवी गोडसे, प्रशांत निंबाळकर, क्रीडा अधिकारी हरनाळे, क्रीडा अधिकारी नायकवाडी, क्रीडा अधिकारी बिराजदार या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक प्रभाकर खरमाटे, धनंजय जाधव व संभाजी राजे निंबाळकर यांनी विजयाबद्दल तसेच कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक, शिक्षक वृंदावनी व पालक वर्गातून या महिला पैलवानांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.