धाराशिव (प्रतिनिधी)- येथील लहुजी चौकामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आद्यक्रांतिगुरू क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अनुसूचित जाती उपवर्गीकरणा संदर्भात नेमण्यात आलेल्या आयोगाचे स्वागत करून  आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे बोलत होते. यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.

 ते पुढे म्हणाले की, एका बिजा केला नाश मग भोगिले कणीस या युक्तीप्रमाणे विष्णू भाऊ यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मातंग समाजाच्या उन्नतीसाठी पूर्ण वेळ काम केले त्यामुळे आता मातंग समाजातील अनेक युवकांना नोकरी मिळणार आहे. विष्णू भाऊ यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाचे चीज झाले त्याबद्दल समाधान वाटते असे ते म्हणाले.लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांनी देखील आयोगाचे स्वागत केले. सर्व मातंग समाजाने हा आनंद उत्सव साजरा करावा असे देखील ते यावेळी म्हणाले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे मारुती क्षीरसागर, आनंद कसबे, दत्ता साठे, कुमार कांबळे आधी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top