भूम (प्रतिनिधी)- भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आज अखेर माजी आमदार राहुल महारुद्र मोटे यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने मतदारसंघात कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली.

भूम, परंडा, वाशी मतदारसंघात शिवसेनेची मशाल की राष्ट्रवादीची तुतारी लढणार यावरून अनेक तर वितकर काढले जात होते. पण आज अखेर महाविकास आघाडीच्यावतीने भूम, परंडा, वाशी ही जागा महाविकास  आघाडीच्यावतीने तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने राहुल मोटे हे लढणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. आगामी निवडणूक ही मोटे, सावंत, घुले व रणबागुल अशी चौरंगी होणार असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. दरम्यान राहुल मोटे यांची उमेदवारी घोषित झाल्याने भूम, परंडा व वाशी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कहो दिल से राहुल भैया फिरसे अशा घोषणा देऊन दिवाळीच्या अगोदर दिवाळी साजरी केली.

 
Top