भूम (प्रतिनिधी)- आरोग्य दूत डॉ.राहुल घुले यांना राष्ट्रीय समाज पक्षाकडून परंडा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज विविध भागातील मतदार संघाचे मतदार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये परंडा मतदारसंघांमध्ये मागील एक वर्षापासून आरोग्याबाबत विविध प्रश्नावर काम करत असलेले आरोग्यदूत डॉ. राहुल घुले यांना अखेर राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या या उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रीय समाज पक्षाकडून परंडा मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला.

 
Top