तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन अखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात उमेदवार निवडी बाबतीत राज्य पातळीवर बरेच शह काटशहाचे राजकारण झाल्याचे बोलले जाते. माञ या राजकारणातील पत्ते मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहेत.
काँग्रेसने धक्का तंञ वापरल्याने पुन्हा भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुध्द काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज कदम पाटील असा सामना रंगणार आहे. मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदार बाबतीत काय भूमिका घेणार यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. माजीमंञी मधुकर चव्हाण यांचे नावे महाविकास आघाडी सर्वेत प्रथम क्रमांकावर होते. त्यांनी जोरदर तयारी सुरु केली. महायुतीतील मिञ पक्षांची त्यांचा बाबतीत साँफ्ट काँनर होता. तरीही काँग्रेस हायकमांडने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे तालुक्यात, जिल्हयात काँग्रेस पक्षास पुढे आणण्याचे आवाहन त्यांच्या समोर असणार आहे.
काँग्रेसने अँड धिरज पाटील यांना उमेदवारी दिल्याने धिरज पाटील यांच्या समोर काँग्रेसला विजय करणे आवाहन ठरणार आहे. तर माजीमंञी मधुकर चव्हाण या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी येथे काँग्रेसला वातावरण पोषक आहे. त्यांनी तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केल्याने उमेदवारास प्रचारास वेळ कमी मिळणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करण्याबाबतीत काँग्रेसने जो विलंब लावला त्या बाबतीत खुद्द काँग्रेस मधुनच नाराजी व्यक्त होत आहे.