तुळजापूर  (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीय नवराञ उत्सवातील अश्विन पोर्णिमा  पर्व संपले कि तुळजापूर तालुकावासियांना दिवाळी खरेदीचे वेध लागतात. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठेतही कपडे सह सोने, वाहने, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनीक साहीत्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक  सोलापूर येथे जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

धाराशिव जिल्हयात मोठी बाजार पेठ निर्माण न झाल्याने दिपावली सणाचा खरेदी साठी तुळजापूर तालुक्यातील ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथे खरेदीसाठी मोठ्या संखेने वाहने करुन जात आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील चलन येथे फिरणे गरजेचे असताना ते पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मोठी बाजार पेठ निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या दिपावली सणाचा पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हयातील व्यवसायीक मोठ्या प्रमाणात येथील ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी विविध आयडिया, आँफर  अस्तित्वात आणत आहे. सोन,  इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनीक वस्तु, कपडे खरेदी साठी दुकानदारांकडून ऑफरची ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठेतही कपडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळत आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने महिलांची-पुरुषांची चिमुकल्यांना कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दिवाळीमध्ये कपडे खरेदी करणे ही एक महत्वाची आणि उत्साहवर्धक परंपरा आहे.या सणाच्या निमित्ताने नवीन आणि आकर्षक कपडे खरेदी करून लोक आनंद साजरा करतात. त्यामुळे  सोलापूरच्या बाजार पेठेत तुळजापूर तालुक्यातील ग्राहक तीस ते चाळीस टक्के दिसुन येत आहे. तसेच फराळाचे साहित्य आणि दिवे, आकाश कंदील, लाईट्सच्या माळा, विविध प्रकारच्या रांगोळी, रांगोळीचे साचे यांचीही खरेदीसाठी सोलापूरच्या विविध बाजारपेठेच्या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातील नागरिकांची गर्दी होताना पहायला मिळत आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने कपड्यांची बंपर ऑफर ठेवण्यात आली आहे. खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसेच महाराष्ट्रातून व सध्या दिवाळीनिमित्त विविध दुकानात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील महिला ग्राहकावर सोलापूर व्यापारी वर्गाने लक्ष केंद्रित केले. प्रथमता धाराशीव जिल्हयात आपल्या मालाची जाहीरात केली गेली. सध्या  साडीच्या खास आणि आकर्षक डिझाईन्स, तसेच पारंपरिक लूक असून यामुळे लोकप्रिय बनली आहे. ज्यामुळे सणासुदीच्या काळात उत्तम वाटते. तसेच यासह फॅन्सीवर्क, सॉफ्ट सिल्क, सिल्क पैठणी, कॉटन, सिथेंटिक, इरकल यालाही पसंती मिळत आहे, असे सोलापूर  व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

लहान चिमुकल्यांसाठी स्टायलिश कपडे बाजारात आले. आपल्या मालाचा जाहीराती  सोशल मीडियावर रिल्स माध्यमातून केल्या जात आहेत. तुळजापूर तालुका हा पश्चिम महाराष्ट्राचा सरहदवर असल्याने तुळजापूर तालुक्यातील ग्राहक खरेदीसाठी थेट सोलापूर गाठत आहे. यामुळे तुळजापूर तालुक्यातील बाजार पेठेत शांततेचे वातावरण आहे. जी बाजार पेठेत गर्दी दिसते ती भाविकांची प्रसाद घेणा-यांची आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मोठ्या बाजार पेठ  निर्माण होण्याचे वातावरण आहे. माञ त्याला राजकिय इच्छाशक्ती अभावमुळे येथे बाजारपेठ तयार होवू शकली नाही. तुळजापूर शहरासह तालुक्यातील हजारो तालुकावासिय कोट्यावधी रुपयाची खरेदी सोलापूर बाजार पेठेत होत आहे.

 
Top