तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. 2024 विधानसभा निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याचा नेमका फटका कुणाला बसणार याचे गणित आखून राजकीय डावपेच आखले जात आहेत. प्रचारात संघर्ष मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेस असाच होणार असे विधानसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. यामुळे खरी चुरशीची लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अटळ असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषणा होण्यापूर्वीच तुळजापूर विधानसभा मतदार संघात पारंपारिक प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपा विरुद्ध काँग्रेस यांच्यातच सोशल मीडिया,डिजिटल फलक, कार्यक्रम सभा, मेळावे विविध विकासकामे भूमिपूजन, समारंभ सभा, जलपूजन सभाद्वारे प्रचार युद्ध पेटले होते. उजनीच्या पाण्याचे श्रेयवाद ईर्षेने पेटलं आहे. भाजपा-काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक संघर्ष पहायला मिळला आहे. तर आमदार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अखेरचा टप्यात विविध विकासकामे भूमिपूजन, सभारंभ निमित्ताने भाजपाच्या प्रचाराचा बार उडवून दिला. उदघाटनाविरुध्द श्रेयवादातुन तालुक्यात अनेक ठिकाणी भाजप विरोध काँग्रेस असा संघर्ष पहावयास मिळाला.
यामुळे तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजप विरुध्द काँग्रेस हीचखरी लढत अटळ असल्याचे राजकीय अभ्यासकाचे मत आहे. काँग्रेसकडून माजी मंञी मधुकरराव चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांनी उमेदवारी मागणी केली आहे. भाजपा, काँग्रेस या दोन प्रतिस्पर्धी उमेदवार व्यतिरिक्त देवराज मिञ मंडळ, तिसरी आघाडी, वंचित बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी यांच्यासह काही अपक्ष उमेदवार युती-आघाडी, मित्र पक्षातील नाराज गट, मराठा क्रांती मोर्चा असे इच्छुकांमुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.