धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कचरा डेपोमध्ये कापलेल्या जनावरांचे मांस टाकले जात आहे. तर कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर ओतला जात असून तो परिसरातील वस्तीतील नागरिकांच्या घरामध्ये जात आहे. विशेष म्हणजे या परिसरात पाचवी ते दहावीपर्यंत भारत विद्यालय असून या विद्यार्थ्यांना देखील या दुर्गंधीचा त्रास नाईलाजाने सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडले व जडत आहेत. त्यामुळे हा कचरा डेपो इतरत्र हलविण्यात यावा तसेच जे कापलेल्या जनावरांचे मांस आणून टाकले व टाकीत आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून हा कचरा डेपो इतरत्र हलविण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना युवा (ठाकरे) च्यावतीने ट्रॅक्टरमध्ये तोच कचरा आणून थेट नगर परिषदेच्या प्रवेशद्वारातच दि.11 ऑक्टोबर रोजी रिचविला. दरम्यान कचरा दुर्गंधीने परिसरातील कुत्रे त्या कचऱ्यातील सडलेले मास खाण्यासाठी तुटून पडले हे विशेष.

धाराशिव नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील गोळा केलेला कचरा गणेश नगर लगत असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकला जातो. या कचरा डेपो लगेच भारत विद्यालय असून या शाळेत इयत्ता 5 वी व 10 वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असून येथील शेतकरी देखील त्यांच्या शेतातच राहत आहेत. या कचरा डेपो मध्ये कचऱ्यासह मेलेली जनावरे, कापलेल्या जनावरांचे मास व इतर साहित्य आणून टाकले जाते. त्यामुळे या हा कचरा डेपो प्रचंड दुर्गंधीचा व आजाराला जन्म देणारा कृत्रिम कारखानाच बनला आहे. कापलेल्या जनावराचे मास टाकणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करतात जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना संबंधिता विरोधात वन्य पक्षी प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्या आदेशाला अक्षरशः केराचीच टोपली दाखवली. त्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करण्यासह तो कचरा डेपो इतरत्र हलविण्यात यावा, या मागणीसाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना युवाचे धाराशिव शहर प्रमुख  रवी वाघमारे, शिवसेनेचे धाराशिव शहर प्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील,प्रकाशराव डांगे, महेश शेरकर, अमीर पठाण, बंडू आदरकर, अरुण कोकाटे, राज निकम, दादा पाटील, प्रदीप तेरकर, प्रदीप पोतदार, सचिन बेंद्रे, शिरीष वाघमारे, मनिषा नरसिंगे, प्रसाद हाके, कुलदीप पवार, हर्ष मडके, बालाजी तेरकर, अमीत कोकाटे, प्रदीप साळुंके, महेश लिमये, संदीप तेरकर, अक्षय खळदकर, अविनाश ईटकर, ओंकार चिंचुणसुरे, ओंकार कुलकर्णी, शुभम गायकवाड, ओंकार जगताप, युवराज मडके, अण्णा साळुंके, अभिजीत कोकाटे, प्रणव मडिवाल, आदर्श चौधरी, शुभम गायकवाड, पिंटू आंबेकर, सागर भांडवले, यश येलगुंदे, सौरव काकडे, मनोज जाधव, प्रकाश शिंदे, वैभव मगर, प्रसाद शिंदे, सागर शेरकर, रफिक शेख, पवन राऊत, मोहन राऊत, मुन्ना तट, तलहा पठाण, अजय फरताडे,कुणाल जानराव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top