तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीय नवराञ उत्सव ते दिपावली सण या कालावधीत भाविक, शहर वासियांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका असते. पण याला कालावधीत त्यांच्या कर्तव्या बाबतीत शंका निर्माण होत असल्याने अन्न भेसळ प्रशासन कोमात, भेसळखोर जोमात अशा प्रतिक्रिया सर्वसामान्या मधुन व्यक्त केल्या जात आहेत.
शारदीय नवराञ उत्सव पंधरा दिवस चालतो. या कालावधीत पंचवीस लाखाचा आसपास भाविक येतात. या काळात राज्यासह परराज्यातुन पाच ते सहा हजार व्यापारी पेढे, हळद, कुंकु सह अन्य साहित्य विक्रीस आणतात. याची तपासणी झाली का असा प्रश्न निर्माण होतो. कारण भेसळ खोरावर कारवाई झाल्याचे दिसुन आले नाही. दुकानदरांना भेटले बोलले व खिशात हात घालुन निघुन गेले.
या कालावधीत काही मोठ्या प्रतिष्ठात व्यापारी वर्गाने बेभाव किंमतीत कुंकु विकले. या कुंकुचा दर्जा तपासला का ? भेसळ कुंकु, हळद, पेढे याचा तर सुळसुळाट होता. पाणी बाँटल कोट्यावधी रुपयाचा विकल्या. याची तपासणी केली का? याचे अहवाल गुलदस्त्यात का असा सवाल केला जात आहे.
याञा काळात अन्न भेसळ प्रशासनाचे अस्तित्व दिसुन आले नाही. या दुर्लक्ष पणामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर भेसळखोरीचे पेव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना अन्न व औषध प्रशासनाकडून म्हणावे तशी पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आगामी निवडणुकांमुळे बहुतांश अधिकारी प्रशासकीय कामात अडकल्यामुळे भेसळखोरी जोमात होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण अशी ओळख असलेला दिवाळीचा सुरु झाला आहे. यात साहित्य तपासणी केली का हा शोधाचाविषय आहे
रवात लोखंडी चुरा, मोहरी धोतऱ्याचे बी, डाळ: रासायनिक रंग, धान्य : खडे, मिठाई : मेटॅनिल पिवळा रंग, लाल तिखट : विटेचा चुरा, खाद्यतेल, खनिज तेल, धने पावडर - लाकडाचा चुरा, दूध : स्टार्च, पाणी, युरिया.अदि भेसळ होण्याची शक्यता आहे असे नागरिकांन मधुन बोलले जाते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग नेहमीच सतर्कता दिसुन येत नाही कच्च्या मालाचे नमुने तपासणी , मिठाई उत्पादनाची तारीख, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बॅच क्रमांक, घटकांची तातडीने तपासणी मोहीम राबववणे गरजेचे असते. अन्न व औषध प्रशासनाचे काही प्रमाणात होणारे दुर्लक्ष भेसळखोरांसाठी यंदा दिवाळीच ठरणार आहे.