धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया दि. 30 ऑक्टोबर रोजी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 185 उमेदवारांनी 271 नामनिर्देशनपत्र दाखल केले.यापैकी चार विधानसभा मतदारसंघातून 164 उमेदवारांचे 223  नामनिर्देशनपत्र वैध तर 48 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत.

240 - उमरगा विधानसभा मतदारसंघातून एकूण प्राप्त 32 उमेदवारांच्या 43 नामनिर्देशनपत्रापैकी 34 नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे.तर 9 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. प्राप्त नामनिर्देशनपत्रामध्ये 28 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. 4 नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहे.

241 - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 54 उमेदवारांनी 87 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यापैकी 77 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे. तर 10 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची संख्या 51 इतकी आहे. तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत. 

242 - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 50 उमेदवारांनी 71 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 55 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. तर 16 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्देशित झालेले 43 उमेदवार असून 7 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.

243 - परंडा विधानसभा मतदार संघात 49 उमेदवारांनी 70 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 57 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 13 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. यातील 42 उमेदवार हे वैधरित्या नामनिर्देशित झाले आहेत. तर 7 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.

दि. 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दुपारी पार पडली.छाननी प्रक्रियेनंतर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत.20 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 1 हजार 523 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.


 
Top