तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री काळ व टोळ भैरव दर्शनार्थ अश्विनी अमावस्यादिनी गुरुवार दि. 31 ऑक्टोबर रोजी भाविकांनी गर्दी केली होती. आज काळभैरवास भाविकांनी तेलाचे अभिषेक करुन मांसाहारी नैवध दाखवला. आज नरक चतुर्थी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मुख्य मुर्तीस पहाटे अभ्यंग स्नान घालण्यात आले. नंतर अभिषेक पुजा नंतर नित्योपचार पुजा करण्यात आली.
अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मंदीर लगत असलेल्या टोळ भैरव व काळ भैरवास स्थानिकांनी मांसाहरी नैवध दाखवुन पुजाअर्चा करुन दर्शन घेतले. काळभैरव दर्शनार्थ काळभैरव कड्यावर शहरवासियांनी गर्दी केली होती.
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांचे अभिषेक चुकले
नरक चतुर्थी दिनाचा पार्श्वभूमीवर पहाटेच्या सिंहासन पुजा, अभिषेक पुजा बाबतीत मंदीर प्रशासनाने नियोजन न केल्याने अभिषेक पास काढुन भाविक पहाटे अडीच वाजता अभीषेक हाँल मध्ये रांगेत थांबुनही त्याचे अभिषेक झाले नाहीत. यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या नियोजन बाबतीत नाराजी व्यक्त केली. मंदीर प्रशासनाने एका सिंहासन पुजेला किती वेळ, अभिषेक पुजेला किती वेळ याचे नियोजन केले असते तर अशी वेळेच आली नसती. त्यामुळे एका सिंहासन व एक अभिषेक पुजेला मंदीर प्रशासनाने वेळ निश्चित करावी व त्याची अमंलबजावणी करावी अशी मागणी भाविकांमधुन केली जात आहे.