तुळजापूर (प्रतिनिधी)- शारदीय नवराञ उत्सवात पाचशे रुपये दर्शन पास घेणाऱ्या भाविकांची सखोल चौकशी करुन पासवरच्या फोटोची खात्री करुनच त्या भाविकास पाचशे रुपये दर्शनार्थ सोडले जात आहे.
देवीदर्शनार्थ नवराञोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असुन, काही अपप्रवृत्ति पाचशे रुपये दर्शन पास काढुन तो गर्दी होताच दुप्पट किमतीत भाविकांना विकली जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंदीर प्रशासनाने पाचशे रुपये दर्शन पास व त्यावरील फोटोची सखोल तपासणी करुनच मंदिरात दर्शनार्थ सोडले जात आहे.
बोगस पुजाऱ्यांना आळा बसण्यासाठी मंदिर पुजारी वर्गाने नेहमी ओळखपत्र बाळगावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पञक काढुन केले आहे. नवराञोत्सव कालावधीत मंदिरात येणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर आळा घालणेसाठी व भाविकांच्या तक्रारी टाळणेसाठी सर्व पुजारी बांधवांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवूनच मंदिरात प्रवेश करावा. जेणे करुन बोगस पुजाऱ्यांवर कार्यवाही करणे मंदिर संस्थानला सोईचे होईल. असे प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.