तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ आलेल्या महिला भक्तांचा गळ्यातील तीन तोळे वजनाचे 90ह जार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण राजेशहाजी महाव्दार समोर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना रविवार दि. 7 ऑक्टोबर रोजी घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, सुनिता वसंत वामन, वय 45 वर्षे, रा. परंडा रोड, शेळके प्लॉट बार्शी ता. बार्शी, जि. सोलापूर या दि.06.10.2024 रोजी 10.00 वाजण्याच्या सुमारास श्री. तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी आले असता शहाजी महाद्वार रांगेत उभा असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुनिता वामन यांचे गळ्यातील 3 तोळे वजनाचे सोन्याचे गठंण अंदाजे 90 हजार किंमतीचे चोरुन नेले. अशी फिर्याद सुनिता वामन यांनी दिल्यावरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे कलम भा.न्या.सं.303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top