तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील भवानी रोडवरील चर्मकार गल्ली जवळ असणाऱ्या लोखंंडी गेट जवळ भाविकांना जा-ये करण्यासाठी एकच छोटे गेट उघड ठेवल्याने भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर येथे प्रचंड गर्दी ये-जा करणारी थांबल्याने येथे भाविकांना मोठा ञास सहन करावा लागला.
रविवारी देवीदर्शनार्थ प्रचंड संखेने भाविक तिर्थक्षेत्री आल्याने भवानी रोडवरुन खाली शिखर दर्शनार्थ जाणारा भाविक व दर्शन करुन बाहेर येणारे हजारो चर्मकार गल्ली जवळील लोखंडी गेट जवळ एकञ येतात. तसे ते आले. बाहेर जाण्यासाठी एकच छोटे गेट मार्ग ठेवल्याने येथे हजारो भाविक जमा झाल्याने हा भाग भाविकांनी तुंबुन गेला होता. भाविकांच्या प्रचंड संखेच्या पार्श्वभूमीवर मोठे गेट उघडे ठेवणे गरजेचे होते. मात्र ते बंद ठेवल्याने भाविकांची तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांची एकच गर्दी झाली. जवळपास एक ते दीड तास येथे सावळा गोंधळ चालु होता. तरीही येथे जबाबदार अधिकारी न आल्याने याचा फटका भाविकांना बसला. नंतर भाविकांचा ओघ वाढताच लोंखडी गेट उघडल्याने हा मार्ग मोकळ्या झाल्याने भाविकांना ये-जा करणे सुलभ झाले.
वर दोन गेट असताना तिथे पोलीस तैनात असताना हे गेटबंद ठेवणे संयुक्तिक नव्हते तरीही ते ठेवले. असेच दोन गेट आर्य चौक व पावणारा गणपती येथील बंद ठेवले आहेत.
व्हीआयपी वाहनांचा रुग्णवाहिकेला फटका
व्हीआयपी वाहनांचा फटका रुग्णवाहिकेला रविवार दुपारी बसला. चर्मकारी गल्ली जवळ असणारे लोखंडी गेट जवळ मधोमध व्हीआयपीचे वाहने लावले व ते मंदिरात दर्शनार्थ गेले. तेवड्यात मंदिराकडुन भाविकांना घेवुन रुग्णवाहिका दवाखान्यात नेण्यासाठी तिथे आली असता गेट उघडले. तरीही गेट मध्यभागी व्हीआयपीचे वाहने असल्याने जाणाऱ्या-येणाऱ्या रुग्णवाहिका जागेवर थांबल्या. अखेर रुग्णाचा जीवाचा विचार करता सर्वांनी धावपळ करुन व्हीआयपी शोधल्यानंतर मधील वाहन बाजूला काढुन रुग्णवाहीका दवाखान्यात गेली. यात जर रुग्ण दगावला असता तर कुणाला जबाबदार धरायाचे असा सवाल भाविकांमधुन केला जात आहे.