भूम (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्यामध्ये भूम,परंडा व वाशी तालुक्यामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी सोयाबीनची काढनी चालू असताना प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आहे. तसेच शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास अलगद हिरावून घेतल्यासारखे झाले. परंतु बेफिकीर प्रशासनाच्या सदोष पर्जन्यमापक यंत्रामुळे शेतकऱ्यांचे झिरो टक्के नुकसान झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. ही एक प्रकारची शेतकऱ्याची क्रूर थट्टा चालवली असेच म्हणावे लागेल.

भूम,परंडा,वाशी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकारी  यांना विनंती आहे आपण त्वरित शासन दरबारी निर्णय घेऊन सरसकट शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूक आचारसंहितापूर्वी नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना अशा संकट समयी आधार द्यावा अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी धाराशिव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर चेतन बोराडे, महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, विधानसभा युवाअधिकारी प्रल्हाद आडगळे, माजी शहर प्रमुख दीपक मुळे, उपतालुकाप्रमुख रामभाऊ नाईकवाडे, भगवान बांगर, अँड विनायक नाईकवाडी, बाबूराव सपकाळ, श्रीमंत भडके, दत्ता बोंबले, कोहीनुर सय्यद, विहंग कदम, लक्ष्मण नागरगोजे, संग्राम लोखंडे अशोक सपकाळ, सोनु राजे जाधव यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top