भूम (प्रतिनिधी)- प्रशासनाकडून रस्त्याची मोजणी करून अखेर तीस वर्षापासून प्रलंबित असलेला सोनगिरी ते चिंचोली रस्त्याचा प्रश्न मिटला.
सोनगिरी कडून चिंचोली उळूप कडे जाणारा रस्ता नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, भुमिअभिलेख, पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप करून खुला करण्यात आला. सोनगिरी येथील काही ग्रामस्थांच्या तीस वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा उपोषण करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाकडून हा रस्ता खुला करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांकडून प्रशासनाचे आभार मानण्यात आले. या रस्त्यामुळे चिंचोली उळूप बाळूमामा मंदिर या भागात जाण्यासाठी सुलभ होणार आहे व या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रस्ता आहे. यावेळी नायब तहसीलदार प्रवीण जाधव, मंडळ अधिकारी एम एस कोळी, भूमी अभिलेखा अधिकारी शैलजाआटोळे पोलीस प्रशासनाचे अमोल कवडे, खोत उपस्थित होते.