भूम (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी महाराष्ट्र राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे यांच्या उपस्थिती निवडी जाहीर करण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह भूम येथे परंडा, वाशी भूम तालुक्यातील शिवसेना मागासवर्गीय विभागाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. या निवडी मध्ये धाराशिव जिल्हा मागासवर्गीय विभाग शिवसेना प्रमुख म्हणून संभाजी शिंदे तर उपजिल्हाप्रमुख दत्ता अहिरे, समाधान बनसोड,  त्याच बरोबर परंडा तालुका अध्यक्षपदी गुलाब शिंदे, वाशी तालुका अध्यक्षपदी दत्तात्रेय शिंनगारे, भूम तालुका अध्यक्षपदी सुनील थोरात तर कार्यकारणी सदस्य म्हणून मालुराजे चव्हाण, अर्जुन टेकाळे, हनुमंत समिंदर आधी कार्यकर्त्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार धनंजय सावंत, दत्ता साळुंखे त्याचबरोबर शिवसेना महाराष्ट्र राज्याचे समन्वयक वैजनाथ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.


 
Top