परंडा (प्रतिनिधी) - राज्यातील कला क्रिडा कार्यानुभव अंशकालीन निदेशकांना कायम संवर्ग करून नियुक्ती देण्यात यावी. यासह विविध मागण्यासाठी  मंगळवार (ता. 7) पासून कला क्रिडा अंशकालीन निदेशक संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदारांमार्फत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व कला क्रिडा कार्यानुभव अंशकालीन निदेशकांबाबत कायम संवर्ग तयार करून नियुक्ती सदर्भात आदेश काढावा. निदेशक शिक्षकांच्या नियुक्तीसाठीची पटसंख्येचे अट शिथील करावी. निदेशकांना इयत्ता पहिली ते आठवी असा वर्कलोड देण्यात यावा. आरटीई नुसार प्राथमिक माध्यमिक शासकीय निमशासकीय शाळामध्ये कला क्रिडा कार्यानुभव निदेशक शिक्षकांच्या त्वरित नियुक्त्या करण्यात याव्यात. जे निदेशक न्यायालयात गेलेले नाहीत त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यासाठी संघटनेने धरणे अंदोलन सुरू केले आहे. यात अंशकालीन संघटनेचे धनंजय सोनटक्के, प्रशांत नांगरे, काकासाहेब गवारे,, संतोष चव्हाण, पोपट केसकर, हनुमंत निरवणे, परमेश्वर मुके, विश्वास बोकेफोडे , कानिफनाथ खैरे, राम गोडगे भाग्यवान रोडगे, रमेश रोकडे, आनंद कुलकर्णी  मंजुषा चव्हाण, एस. के. जिकरे,यास्मीन पल्ला, मनिषा शिंदे, यशोदा चोंबे, भरत फाळके, सद्दाम सय्यद, चंद्रकांत जगताप सहभागी झाले आहेत. या अंदोलनास भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भारत घोगरे , फुले आंबेडकर विद्वत्व सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे , राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडगे, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे कॉग्रसचे नितीन गाढवे, सचिन सोनारीकर, मुकंद देशमुख प्रा. मांगले, कला शिक्षक श्याम पाटील मनसेचे शहराध्यक्ष नवनाथ कसबे, माहिती अधिकार कार्यकर्ते फारूख शेख, कानिफनाथ सरपणे, भाजपाचे अजित पाटील. प्रहारचे अप्पा तरटे, घनश्याम शिंदे, हनुमंत गायकवाड खय्युम तुटके, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, डी बी ए समुहाचे दयानंद बनसोडे यांनी भेट दिली.


 
Top