कळंब (प्रतिनिधी)- रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखेच्या वतीने कै. विजया रामकृष्ण लोंढे यांच्या स्मरणार्थ शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरील शिबीर नियमितपणे घेतले जात असून यावर्षी शिबीराचे दहावे वर्षे आहे. शिबीरार्थिंची बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. कॅन्सर संशयित पेशंटचे पॅप स्मियर घेऊन लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. काही पेशंटला पूढील चाचण्यासाठी बार्शी येथे बोलावण्यात आले आहे.
या शिबिराला जोडूनच कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कॅन्सर ग्रस्त पेशंटचे रंगीत पोस्टर प्रदर्शनी आयोजित केली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त दिसून आला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ नागनाथ धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ मंजुराणी शेळके मॅडम, रोटरी अध्यक्ष रो अरविंद शिंदे, सचिव रो पापा काटे, इनरव्हिल अध्यक्षा डॉ प्रतिभा भवर मॅडम, सचिव डॉ प्रियंका आडमूठे, प्रकल्प प्रमुख डॉ दिपाली लोंढे, रो संजय घुले, रो धर्मेंद्र शाहा, रो मांडवकरनाना, डॉ सत्यप्रेम वारे, डॉ अभिजित लोंढे, डॉ सुधीर आवटे, डॉ सुयोग काकानी, डॉ शरद दशरथ, संगीता घुले, डॉ मेघा आवटे, माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांनी व्हाईस कॉल द्वारे संदेश देऊन सुभेच्छा दिल्या, वर्षा जाधव, ज्योती पवार, राजश्री देशमुख, प्रफुल्लता मांडवकर, आनंद रणदिवे, संभाजी कोळी, सुनील लिके-पाटील, टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल बार्शीचे तज्ञ आदींनी परिश्रम घेतले.