तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन महंत तुकोजीबुवा यांना उमेदवारी दिली तर लढतील असे प्रतिपादन महंत तुकोजी बुवा यांचे बंधु विनोद गंगणे यांनी हाँटेल स्काँयलँन्डमध्ये रविवार दि. 28 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले .
यावेळी बोलताना विनोद गंगणे म्हणाले कि, तुळजापूर 214 विधानसभा मतदारसंघातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभेसाठी तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटला यांनी लढण्याचा आदेश दिला तर आमचे बंधू महंत तुकोजी बुवा हे निवडणूक लढवतील.
यावेळेस माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, आनंद कंदले, नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, नरेश अमृतराव, लखन पेंदे, सागर सागर कदम, अविनाश गंगणे, निलेश रोचकरी, माऊली भोसले, विशाल छत्रे, राजेश शिंदे, समाधान भोसले, औदुंबर कदम, दयानंद हिबारे, इंद्रजीत साळुंखे, अमरीश जाधव, राजेश्वर कदम, नानासाहेब लोंढे, विनोद पलंगे, अँड संजय पवार, माजी नगरसेवक दयानंद हिंबारे, संजय परमेश्वर, राजेश शिंदे, धर्यशिल दरेकर, लखन पेंदे, माऊली भोसले, रत्नदीप भोसले, राहुल भोसले सह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.