धाराशिव (प्रतिनिधी)- भूमी हि तामिळनाडू मधील स्वयंसेवी संस्था असून याच सामंजस्य करार अंतर्गत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात फाउंडेशन स्किलिंग फॉर यूथ ही थीम पुढे ठेवून डिजिटल 101 जर्नी या सर्टिफिकेशन अंतर्गत डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, पायथन व इंटरनेट ऑफ थिंग्स या नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी मध्ये विद्यार्थ्यांना कौशल निर्मिती निर्माण करण्यासाठी नासकॉम व मासटेक फौंडेशन मदतीने आणि भूमी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिनांक 26 सप्टेंबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधी मध्ये 200 हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल 101 जर्नी सर्टिफिकेशन प्राप्त झाले.
संगणक विभाग, आर्टीफिसिअल इन्टेलेन्स आणि डेटा सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्युनिकेशन विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील 360 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आयोजित केले होते. भूमी या संस्थेचे ट्रेनर रामास्वामी यांनी प्रामुख्याने प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी प्रतिपादन केले कि “महाविद्यालय नेहमीच इंडस्ट्रीज साठी लागणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना यावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या संख्येमध्ये व पॅकेज मध्ये ही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आतापर्यंत 360 पैकी जवळपास 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी डिजिटल 101 जर्नी सर्टिफिकेशन पूर्ण केले असून बाकी विद्यार्थी पूर्ण करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था व्यवस्थापन व महाविद्यालयाच्या वतीने कौतुक व अभिनंदन केले आहे.