भूम (प्रतिनिधी)- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन पाटील कुटुंबाची धाराशिव जिल्हासंपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाल्याने मोठ्या प्रमाणात दुःख होत आहे. शिवसेना पक्षांमध्ये मोठी फूट पडल्यानंतर भूम - परांडा -वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी त्यांची स्पष्ट भूमिका बजावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे भूम -परंडा - वाशी विधानसभा मतदारसंघात मी भक्कमपणे उभा आहे असे उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितले होते. त्यांचे मातोश्री मध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिकांना दुःख झालेले आहे असा निष्ठावंत शिवसैनिक हरपल्याने मोठ्या प्रमाणात दुःख होत आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करून धाराशिव शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी दुःख व्यक्त केले.
धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधमान जिल्हा प्रमुख आहेत व पुतने मेघराज पाटील तालुका प्रमुख आहेत. यावेळी विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, भूम तालुका प्रमूख ॲड श्रीनिवास जाधवर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, माजी शहर प्रमुख दिपक मुळे, युवासेना माऊली शाळू, बार्शी उपतालुका प्रमुख बाळासाहेब नाईकवाडी, जयकुमार जैन सभापती, बुद्धीवान लटके, प्रशांत गायकवाड, छोटू काका सराफ, यांच्या सह उपस्थित होते.