तेर (प्रतिनिधी)- एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे, भारत एमआयटी आर्ट्स, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे यांच्या वतीने दहाव्या विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेमध्ये धाराशिव तालुक्यातील तेर येथील हभप. दीपक महाराज खरात यांना 'समर्पित जीवन गौरव पुरस्कार ' देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय अध्यात्मिक विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रबोधन कार्य, संतपरीक्षक श्री. गोरोबा काकांचे जीवन चरित्र व व्ांडमय यांचा प्रसार, प्रचार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. विश्वराज बाग लोणी काळभोर पुणे येथे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. गुप्ता, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, एमआयटी चे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.