तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीरा जवळील शुक्रवार पेठ भागाकडे जाणाऱ्या भागाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या काढुन तिथे रस्ता तयार केला असताना त्या रस्ता मध्यभागी दीडशेच्या आसपास दुचाकी वाहने लावले जात असताना ही नवराञोत्सवात हा रस्ताच दुचाकि वाहन तळ बनले आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीरा लगत शुक्रवार कडे जाणाऱ्या रस्त्यावर दगडी पायऱ्या व लोखंडी गेट असल्याने याचा फटका भाविकांना मार्गक्रमण करताना होत होता तर लोखंडी गेटमुळे वाहने येजा होत नव्हते. नवराञोत्सव पुर्वी सदरील पायऱ्या काढुन तिथे सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. येथील लोखंडी गेट पावणारा गणपती येथे लावले होते. सध्या मंदीर लगत असलेल्या सिमेंट रस्त्यावर दुचाकी लागत असल्याने आधीच अतिक्रमणे, नंतर दुचाकी लागत असल्याने रुंद रस्ता अरुंद होत असुन मोकळा रस्ता हेतु साध्य झाला नाही. तरी सदरील रस्ता अतिक्रमण मुक्त ठेवण्याची मागणी होत आहे.