तुळजापूर (प्रतिनिधी)- महायुतीत आम्हाला येथील लोकप्रतिनिधी  सापत्न वागणुक देतात. सत्तेत वाटा मिळत नाही. या बाबतीत आम्ही उपमुखमंञी अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असुन आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आम्ही आमचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार  गटाचे श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी दिला.

यावेळी बोलताना नवगिरे, सुर्यवंशी म्हणाले कि, लोकसभेला घड्याळ चिन्हाला 90 हजार मते मिळाले आहे. येथे आमचा हक्काचा 30 हजार मतदार आहे. आमच्या मागण्यांची दखल 26 तारखेपर्यत घ्यावी अन्यथा आम्ही 27 तारखेला निर्णय घेणार असल्याचे यावेळी म्हणाले. सत्तेत आम्हाला वीस टक्के वाटा द्यायचा ठरला होता. एक टक्का ही दिला गेला नाही. उमेदवारांनी उमेदवारी जाहीर होवुन ही अद्याप आम्हाला साधा फोन केला नाही. आमच्या कार्यकर्त्यांची भावना  उपमुखमंञी  अजित पवार यांना मुखमंञी करण्याची आहे. त्यामुळे कार्यकर्ते आम्हाला विचारत असल्याने आम्ही तुमच्या समोर आलो आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा जळकोटचे उपसरपंच, तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवशी, विधानसभा अध्यक्ष मलंग शेख, महेश चोपदार शहराध्यक्ष, नितिन रोचकरी युवक शहराध्यक्ष, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, माजी नगरसेवक कदम, दत्ता हुंडेकरी, गोरख पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

 
Top