भूम (प्रतिनिधी)- मराठा म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशाने भूम मध्ये दिनेश मांगले यांचा मोठ्या गाजावाजा करत एक मराठा लाख मराठा घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेवतीने एबी फॉर्म असलेला अचानकपणे भूम तहसील मध्ये हजर होऊन उमेदवारी अर्ज भरला. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांनी सुद्धा अचानकपणे भूम तहसील कार्यालयामध्ये येऊन अपक्ष फॉर्म भरला असल्याने विविध चर्चेला भूम तालुक्यात उधाण आले आहे.

मध्यरात्री काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचा फोटो सोशल मीडिया वरती व्हायरल होत असताना भूम परंडा वाशी तालुक्यातील महाआघाडीची जागा शिवसेना गटाला गेली असल्याचे स्पष्टपणे संकेत मिळत असताना अचानकपणे माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बी फार्म सोबत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीत बिघाडी होणार की म्हणून मिलन होणार अशी चर्चा सुरुवात आहे. फॉर्म भरल्यानंतर राहुल मोट यांच्याशी संवाद साधला असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही आघाडी धर्म पाळणार आहोत. वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. परंतु सध्या उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य होते म्हणून अर्ज दाखल केला असल्याची त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितली.

मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे दिनेश मांगले यांनी या मतदारसंघातील विद्यमान असो व इतर कोणी असो मी त्यांना विरोध आव्हान माहीत नाही कारण मराठ्यांचा आरक्षण न मिळाल्याने मराठा युवक युवती मोठमोठे अधिकारी पदावर होण्यापासून वंचित ठेवणारे सत्ताधारी यांच्या विरोधात जन आक्रोश विरोध असल्याने मी निवडून येणार आहे यामुळेच मी उमेदवारी अर्ज भरला असे त्यांनी पत्रकारांशी सांगितले. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण बगुल यांनी अपक्ष उमेदवार अर्ज आपण भरत आहोत एबी फार्म सहित आपण लवकरच फॉर्म भरणार असून पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. सर्वसामान्य जनतेसाठी भूम परंडा वाशी तालुक्याच्या विकासासाठी आपण उमेदवारी भरत आहोत मी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच लढाई मतदारसंघात मी चार महिन्यापासून मतदार संघात फिरत आहे. मला लोकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याने मी विजय उमेदवार राहणार असल्याचे सांगितले.

 
Top