धाराशिव (प्रतिनिधी)- आयआयटी मद्रास तर्फे घेण्यात येणाऱ्या एनपीटीइएल परीक्षेत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी नुकतेच यश मिळविले.
संगणक अभियांत्रिकी मधील फरहान मनियार व अभिषेक माने या विद्यार्थ्यांनी क्लाउड कंप्युटिंग या विषयामध्ये हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला व साक्षी गाटे या विद्यार्थ्यानीने प्रोग्रामिंग इन जावा या विषयामध्ये हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. तसेच सिव्हिल अभियांत्रिकीची विद्यार्थिनी सोनिया तुपसुंदरे हिने मेंटेनन्स ऍण्ड रिपेअर ऑफ काँक्रिट स्ट्रक्चर्स या विषयामध्ये हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. 50 हून अधिक विद्यार्थी चालू वर्षांमध्ये वेगवेगळ्या अद्यावत तंत्रज्ञानावर ऑनलाइन एम पी टी इ एल सर्टिफिकेशन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाविद्यालयाला सिव्हिल विभागाकडून एनपीटीइएलकडून मेंटेनन्स ऍण्ड रिपेअर ऑफ काँक्रिट, एनर्जी एफिशियन्सी अँड ऍकॉस्टिक यासारख्या अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त सर्टिफिकेशन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केले म्हणून सिल्वर हे नामांकन मिळाले होते.
या यशाबद्दल चारही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे एनपीटीएल प्रोग्राम समन्वयक प्रा.डॉ. सुशीलकुमार होळंबे यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच मल्हार पाटील, सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी उपक्रमाचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले