भूम (प्रतिनिधी)-  सप्टेंबर महिन्यात ऐन पीक काढणीच्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे परांडा भूम वाशी तालुक्यातील सर्वत्र नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सप्टेंबर महिन्यात ऐन पीक काढणीच्या दिवसात परांडा भूम वाशी तालुक्यातील सर्वत्र अतिवृष्टी झाली. प्रशासानाकडे असलेली पर्जन्यमापक यंत्रणा ही सदोष असल्याकारणाने योग्य व खरी आकडेवारी समोर आलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की सप्टेंबर महिन्यात ऐन पीक काढणीच्या दिवसात तिन्ही तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कष्टाने पिकवलेला हातातोंडाशी आलेला घास हातातून गेलेला आहे. सर्वच शेतकन्यांचे अतोनात नुकसान झालेले असून परांडा आणि वाशी तालुक्यात प्रत्यक्षात झालेले नुकसान हे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे. आणि यामध्ये भूम तालुक्यात तर 0% नुकसान दाखवून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्यात आलेली आहे. प्रशासानाकडे असलेली पर्जन्यमापक यंत्रणा ही सदोष असल्याकारणाने परांडा भूम वाशी तालुक्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर मंजूर करण्यात यावी अशी मागणी मोटे यांनी केली आहे.

 
Top