तुळजापूर (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी, आदिशक्ती, जगत्जननी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवराञ उत्सवातील पाचव्या माळे दिनी देविचा वार मंगळवारी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांनी मंगळवारी पहाटे एक वाजल्या पासुन देवी दर्शनासाठी मंदिरात प्रचंड गर्दी केली. भगवान श्रीकृष्ण यांनी जगदंबा मातेस आपली मुरली (बासरी) दिली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आज तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार पुजा“ मांडण्यात येते असे सांगितले जाते.
तुळजापुरात पाचव्या माळेला दोन लाखाचा आसपास भाविकांनी देवी दर्शन केले. यातील काहीनी शिखर, मुख, धर्म, पेड दर्शन घेतले. मंगळवार पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन. धर्मदर्शनास प्रारंभ झाला. सकाळी 6 वाजता भाविकांच्या अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. संध्याकाळी पुन्हा अभिषेक पूजा झाल्यानंतर मंदिर परिसरात देवीजींचा छबिना काढण्यात आला. त्यानंतर प्रक्षाळपूजा होऊन नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.
पंचक्रोतील भाविकांची पायी वारी सेवा
शारदीय नवराञ उत्सवातील पाचवा माळे दिनी आलेल्या मंगळवार पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर शेजारील सोलापूर, लातूर, बार्शी, धाराशिव येथील देविभक्त पायी चालत येवुन देवीचरणी पायी वारी सेवा अर्पण केली.