तुळजापूर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याबद्दल तुळजापूर खुर्द येथील विद्यार्थिनी तेजस्विनी शंकर ठेले हिचा नगर परिषद शाळा क्र. 3 तुळजापूर या शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
तेजस्विनीचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र.3तुळजापूर येथे तर पदवीचे शिक्षण अपसिंगा रोड येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे झाले आहे. तिने एम. ए. एज्युकेशनचे शिक्षण अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे पूर्ण केले आहे. एम.एस. सी. इन सोशल डेव्हलपमेंट यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी तिची निवड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे झाली आहे. तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा ओबीसी महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, शिक्षण विभाग प्रमुख अशोक शेंडगे, शंकर ठेले, ज्योती शंकर ठेले तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.