तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणीची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी माजीमंञी मधुकर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अनेक गावामध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. वृत्तपत्र, सोशल मिडिया व दुरदर्शनच्या माध्यमातून अनेक गावात बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. त्यानुसार तातडीने
बुथ निहाय नवीन मतदार यादीचे चावडी वाचन करुन बोगस मतदाराची चौकशी करुन संबंधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी केली आहे.