तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजाभवानी मंदिर संस्थान ने सर्व लोगो जनतेकरीता खुले करून त्याची वोटींग करावी. सर्व लोगो आपल्या मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर वोटींग करिता उपलब्ध करून सर्वात जास्त वोटींग  प्राप्त झालेल्या लोगोच्या निवड प्रक्रियेचा निकाल उपलब्ध करुन देण्याची मागणी बजरंग दलाने तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांना निवेदन देवुन केली.

जाहीर प्रगटनाव्दारे आपण मंदिर संस्थानचा लोगो अंतिम करण्याकरिता लोगो मागविण्यात आला होता. तरी आपण दि 20 ऑक्टोबर 2024 रोजी तुमच्या संकेतस्थळावर एकूण प्राप्त झालेल्या लोगो  पैकी फक्त 5 लोगोकरिता वोटींग ठेवली आहे. तेव्हा यात कुठेतरी एकूण प्राप्त झालेल्या लोगोपैकी आपण कोणत्या मुद्यावर फक्त 5 लोगो अंतिम केले आहे. यांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या कार्यालयामार्फत एकूण प्राप्त झालेल्या सर्व लोगोवर वोटींग  का ठेवली नाही? हा प्रश्न निर्माण होतो. 

तसेच सदरील प्रक्रियेत जनतेतून निवड प्रक्रिया दाखविण्यात यावी. तसेच निवड झालेला लोगो कुठल्या आधारावर निवड झाली ते दाखविण्यात यावे. परंतू मंदिर संस्थानने सर्वच लोगो जनतेकरिता खुले न करता डायरेक्ट निवड जाहीर करण्यात आली. ही चुकीची पध्दत अवलंबण्यात आली असून तसे न करता सर्व लोगो जनतेकरीता खुले करून त्याची  वोटींग करण्यात यावी. तरी सर्वच्या सर्व लोगो आपल्या मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर वोटींग  करिता उपलब्ध करून सर्वात जास्त वोट  प्राप्त झालेल्या लोगोच्या निवड प्रक्रियेचा निकाल सुध्दा नागरिकांसाठी उपलब्ध करावा ही विनंती. अशा मागणीचे निवेदन बजरंग  दलाचे अर्जून सांळुके, सुदर्शन  वाघमारे, पंकज काळे यांनी दिले.

 
Top