तुळजापूर (प्रतिनिधी) - माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागातर्फे घेण्यात आलेल्या क्विझ कॉम्पिटिशन मध्ये 75 विध्यार्थांनी सहभाग घेतला.
विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डी. जे. वाघमारे यांनी आयोजन केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य आर. एच. आडेकर यांनी केले. यात अदिती येवले, वैष्णवी शिंदे, बॅग फतिमा हे यशस्वी झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागाची विभाग प्रमुख प्रा. डी. जे.वाघमारे, प्रा. एस. एस. काळे व प्रा. कदम नायक यांनी परिश्रम घेतले.