तुळजापूर (प्रतिनिधी)-  मतदाराचा कुठलाच बोगस अर्ज स्विकारला नसुन बोगस आधार कार्ड असुन मतदार यादी व मतदान कार्ड बोगस नसल्याचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हेळे यांनी केला आहे.

या बोगस अर्ज प्रकरणावर भाष्य करताना डव्हेळे म्हणाले कि, आचार संहिता 15 ऑक्टोबरला लागली.  16 ऑक्टोबरला राजकिय पक्ष, पदाधिकारींची बैठक घेतली असता यात राजकिय पक्ष, पदाधिकारींनी मोठ्या प्रमाणात काही लोक बोगस आधार कार्ड आधारे नोंदणी करीत असल्याचे सांगताच तात्काळ तहसिलदार यांनी अर्ज तपासणी आदेश दिले.

यात 1 ते 5 ऑक्टोबर कालावधीत 1350 नोदणी अर्ज दाखल झाले. यात 6 ते12 आँक्टोबर कालावधीत मोठ्या प्रमाणात म्हणजे 7000 अर्ज आले. या तपासणी मध्ये 6065 अर्ज नामंजूर केले. 157 अर्ज मंजूर केले अजुन ही 920 अर्ज तपासणी प्रक्रियेत आहेत.

1 सप्टेबर ते 20 आँक्टोबर या कालावधीत आलेल्या अर्जापैकी 6200 अर्ज नामंजूर केले. अजुन ही काही अर्ज सिस्टीममध्ये तपासणी साठी राहिले आहेत. तहसिलदार यांनी तक्रार केली आहे. पोलिस तपास करीत आहेत. तसेच कुठलाच बोगस अर्ज स्विकारला नाही. तरी जनतेने माध्यमांवरचा अफवांवर विश्वास ठेवु नये. राजकिय पक्षांच्या सजग पणामुळे जवळपास 6200 बोगस नोंदणी अर्ज उघडकीस आले. ही संख्या लक्षणीय असल्याने या रँकेटच्या मुळाशी जावुन याचा मोरक्या जेरबंद करण्याची मागणी मतदारांमधुन केली जात आहे. या प्रकरणी अनेक जण चुप्पी साधत असल्याने मतदारांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 
Top