तुळजापुर (प्रतिनिधी)-येथील रामदरा तलाव जवळ मोकळ्या जागेत एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 वर्षीय पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह रविवार सकाळी मिळून आला आहे.
याची दाढी वाढलेली पांढरी, मिशा लहान, नाक मोठे, डोक्याचे केस पांढरे, अंगात निळी जीन्स त्यावर दोन्ही बाजूने लहान लाल निळा पट्टा,अंडर वेअर नाही, व काळसर रंगाचे आदिदास कंपनीचे हाफ टी शर्ट,अशा वर्णनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. वरील वर्णनाचा कोणी इसम हरविले बाबत किंवा अशा वर्णनाच्या व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन तुळजापुर येथे संपर्क करावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.