धाराशिव (प्रतिनिधी)- दीपावलीचा सन 1 नोव्हेबर पासून सुरु होत आहे. व दिवाळीत करोडो रुपयांचे फटाके फोडले जातात व अनेक जणांचा या मद्ये मृत्यू होतो. तर अनेक जणांचे शरीराचे अवयव निकामी होतात व त्यामधून ध्वनी प्रदूषण होते. फटाक्या मधील सल्फर या विषारी वायू मुळे वायू प्रदूषण होत. अनेकांना श्वसनाचा त्रास होतो. त्यामधून करोडो रुपयांचा चुराडा होतो. फाटक्यापासून अनेक दुष्यपरिणाम होतात ही बाब विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी निदर्शनास आणून दिली व विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. आज शाळेच्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणीच्या 260 विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी या वर्षीची दिवाळी एकही फटाका न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करणार व वसुंधरे चे रक्षण अशी शपथ घेतली व आजू बाजूच्या लोकांना पण फटाके फोडन्यापासून रोखणार अशीही शपथ घेतली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी शपथ दिली. या वेळी शाळेतील 260 विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.