धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल शनिवार दि.26.10.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 15 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 11,270 लि. द्रव नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 1,348 लिटर गावठी दारु, 285 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 77 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रव व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 7,88,800 आहे. यावरुन 15 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 15 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात शिवाजीनगर खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-धोंडीबा बंडू जाधव, वय 46 वर्षे, हे 09.22 वा. सु. शंकर टिंकराम जाधव यांचे पडीक शेत गट नं 72 मध्ये खडकी शिवारात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 800 लिटर द्रव व 10,400 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली. तसेच सेवालाल नगर मार्डी ता. उ सोलापूर जि. सोलापूर येथील-शंकर नारायण वडजे, वय 48 वर्षे हे 14.30 वा. सु. नागोबा मंदीराचे पाठीमागे सारगाव येथे 50 लिटर गावठी दारु सुझुकी स्कुटी सह अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापा टाकला. यात जवाहर चौक तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-भारत भगवानसिंग राजपुत, वय 34 वर्षे, हे 20.15 वा. सु. रुषी कदम यांचे शेताजवळ लातुर रोड तुळजापूर येथे 225 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले. तसेच सराया धर्मशाळेच्या पाठीमागे तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील भैया अशोक परिट, वय 38 वर्षे, हे 11.00 वा. सु. कमानवेस तुळजापूर येथे 125 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
परंडा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी दुधी ता. परंडा जि. धाराशिव येथील- सविता विष्णु काळे, वय 25 वर्षे या 08.10 वा. सु. संतोष कदम यांचे शेताचे कडेला दुधी व बावची शिव येथे 300 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली. तसेच दुधी ता. परंडा जि. धाराशिव येथील- पोपट बापू काळे, वय 40 वर्षे हे 08.10 वा. सु. महादेव मंदीराचे पाठीमागे दुधी गावात नदीचे कडेला 600 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली
शिराढोण पो.ठा. च्या पथकाने बोरगाव पारधी वस्ती येथे छापा टाकला. यावेळी बोरगाव पारधी वस्ती ता. कळंब जि. धाराशिव येथील-शितल नितीन काळे, वय 23 वर्षे, या 17.45 वा. सु. पारधी वस्ती बोरगाव शिवार येथे 49 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली.
भुम पो.ठा. पथकाने कल्याणनगर पारधीपीडी भुम येथे छापा टाकला. यावेळी पारधीपिडी कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव येथील- राणी धनाजी काळे, वय 35 वर्षे, या 09.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 350 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
नळदुर्ग पो.ठा.च्या पथकाने चिवरी गावात छापा टाकला. यावेळी चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-लक्ष्मण नारायण कोरे, वय 43 वर्षे, हे 18.00 वा. सु. चिवरी मंदीराचे डावे बाजूला 55 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
लोहारा पो.ठा. च्या पथकाने उंडरगाव येथे छापा टाकला. यावेळी उंडरगाव ता. लोहारा जि. धाशिव येथील- बालाजी जगन्नाथ सुर्यवंशी, वय 47 वर्षे हे 11.20 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर देशी विदेशी दारुच्या 70 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
कळंब पो.ठा. च्या पथकाने मोहा पारधी पिडी येथे छापा टाकला. यावेळी मोहा पारधी पीडी ता. कळंब जि. धाराशिव येथील-बापु मखल काळे, वय 70 वर्षे, हे 16.30 आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 400 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने काकानगर येथे छापा टाकला. यावेळी काकानगर सांजा ता. जि. धाराशिव येथील-संगीता छगन काळे, वय 40 वर्षे, या 18.50 वा. सु. आपल्या राहत्या घराचे शेडमध्ये 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली.
वाशी पो.ठा. च्या पथकाने मांडवा येथे छापा टाकला. यावेळी मांडवा ता. वाशी जि. धाराशिव येथील-सुरेखा शंकर शिंदे, वय 35 वर्षे, या 18.30 वा. सु. मांडवा मुख्य चौकात 25 लि गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 7 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या.
येरमाळा पो.ठा. पथकाने संभाजीनगर येरमाळा येथे छापा टाकला. यावेळी संभाजीनगर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव येथील- सुरेश पापा शिंदे, वय 56 वर्षे, हे 17.50 वा. सु. आपल्या राहत्या घरामध्ये गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 120 लिटर द्रव व 114 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
मुरुम पो.ठा. पथकाने दाळींब येथे छापा टाकला. यावेळी कुंभारी द. सोलापूर ह.मु. महादेव नगर मुरुम जि. धाराशिव येथील- राजकुमार निलाप्पा कोळी, वय 27 वर्षे, हे 19.00 वा. सु. मुरुम येथे 60 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.