धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडी बाजार व नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथील सुरू असलेले शौचालय देखभाली अभावी बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने ते तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.15 ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडी बाजार व नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथील शौचालय हे पाणी तसेच देखबाल अभावी बंद आहेत. ते शौचालय बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना उघड्यावरती शौचालयास जावे लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ ते शौचालय सुरू करून त्या ठिकाणी पाणी व देखभालीची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अंकुश चौघुले, अनिल चौघुले, शिवाजी इटलकर, प्रमोद इंगळे, संतोष कुऱ्हाडे, लक्ष्मण जाधव अमोल देवकर, कविता चंदनशिवे, द्रोपदी कटारे तहिरा सय्यद, हिना सय्यद व इनतियाज फकीर यांच्या सह्या आहेत.