तुळजापूर -   रेशन  दुकानदारांच्या मार्जीनमध्ये किमान ३०० रु. प्रति क्विंटल वाढ यासह इतर मागण्यांसाठी  जिल्हयातील रेशन दुकानदार दि.०१ नोव्हेंबर २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इषारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन दिला,

आनंदाचा शिधा जिन्नस संचाच्या वितरणाकरिता प्रती शिधा जिन्नस प्रमाणे १५% टक्के मार्जीन द्या,  वाणिज्य कमर्शियल ऐवजी घरगुती दराने विज पुरवठा करण्यात मालमत्ता करामध्ये सवलत मिळावी. रास्तभाव धान्य दुकानाचे सुनिश्चित व्यवस्थापन करण्याकरिता ईमारत / दुकानभाडे, विज बिल, इंटरनेट खर्च, स्टेशनरी खर्च तसेच मापाडी पगार या सारख्या इतर अनुषंगीक बाबीसाठी ग्रामीण व शहरी भागाकरिता ३००० ते रूपये ७००० रक्कम निर्धारित, नियमीत मार्जीन व्यतिरीक्त व्यवस्थापन खर्च म्हणून देण्यात यावी. धान्याचे वाटप बिल रक्कम  महिन्याचा पाच तारखे पर्यत द्या  .या मागण्याची दखल न घेतल्यास  दुकानदार दि.०१ नोव्हेंबर २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इषारा निवेदन प्रसाद उज्वलसिंह राजेनिंबाळकर समाधान कदम प्रफुल्लकुमार शेटे  यांनी दिले

 
Top