तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेस दर्शनार्थ येणाऱ्या देविभक्तांना स्वच्छ, शुध्द थंड मोफत पाणी मिळण्यासाठी लातुर रस्त्यावर असणाऱ्या नव्या बसस्थानकमध्ये बालाजी अमाईन्स प्रा. लि. तामलवाडी, सोलापूर यांच्या वतीने शारदीय नवराञोत्सव पुर्वी जुने अँरोप्लाँट काढुन टाकुन तिथे नवा अँरोप्लाँट बसवल्याने याचा लाभ देवीदर्शनार्थ येणाऱ्या लाखो भाविकांची तहान भागुन होत आहे. या पाण्याने तहान भागत असल्याने भाविक प्रवासी बालाजी अमाईन्स कंपनीचे सर्वेसर्व रेड्डी बंधुना मनापासून धन्यवाद देत आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, या पुर्वी बालाजी अमाईन्स कंपनीने येथील नव्या बसस्थानकात पाचशे लिटरचा अँरोप्लाँट बसवला होता. माञ त्याचे व्यवस्थित मेंन्टनस न केल्याने तो दीडवर्षापासुन बंद होता. या काळात भाविक, प्रवाशांना वीस रुपये लिटर पाणी बाँटल विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत होती. या अँरोप्लँन्टची दुरुस्ती येथील पाणी विक्रत्यांना होण्यासाठी केली जात नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत होता. अखेर याची दुरुस्ती केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर बालाजी अमाईन्स प्रा. लि. चे व्यवस्थापक संचालक राम रेड्डी व सहाय्यक व्यवस्थापक संचालक राजेश्वर रेड्डी यांनी मेन्टनन्सची कटकट नको म्हणून 500 लिटरचा अँटोमँटीक पाणी स्वच्छ करणारा अँरोप्लँन्ट वाँटरफिल्टर नवराञोत्सव पुर्वी बसवुन कार्यन्वित केला. याचा लाभ आज येथे आठ ते दहा हजार भाविकांना होत आहे.
अँटोमँटीक आँपरेट सिस्टीम !
पुर्वी बसवलेला अँरोप्लँन्टसाठी आँपरेटींग करावे लागत होते. ते न केल्याने आतील भाग अँटोवाँल गंजुन अँरोप्लँन्ट नादुरुस्त झाला होता. आता माञ अँटोवाँलवाली सिस्टीम बसवल्याने आँपरेटींग गरज नाही.