धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवारांचे निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवाराला हे बँक खाते त्याच्या नावे किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावाने उघडता येते.सहकारी बँक तसेच कोणत्याही बँकेत किवा पोस्ट ऑफीसमध्येही खाते उघडता येते.
उमेदवारांने निवडणुक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधीत बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातुन उमेदवाराने आपला निवडणुक खर्च धनादेश/धनाकर्ष/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे.
उमेदवारांना बँक खाती उघडल्यास तत्पर सेवा मिळावी व निवडणुक काळात संबंधीत खात्यातुन प्राधान्याने पैसे काढण्यास आणि पैसे जमा करण्याच्या उद्देशाने समर्पित काऊंटर (Dedicated Counter) उघडणेबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी निर्देश दिले आहे.