तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी सोमवार दि. 28 ऑक्टोबर रोजी 24 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असुन या पुर्वी 8 उमेदवारांनी दाखल केले होते. एकुण 32 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवार शेवटचा दिवस असुन या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सोमवारी महाविकास आघाडीकडुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील, वंचितच्या डाँ. स्नेहाताई सोनकाटे, तुकोजी बुवा, अशोक जगदाळे, समाजवादी पार्टी कडुन अमीर शेख, संतोष दुधभाते, योगेश केदार, सज्जन सांळुके आदी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माजीमंञी मधुकर चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माञ त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते मंगळवार रोजी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.