धाराशिव (प्रतिनिधी)- भूम परंडा वाशी मतदारसंघ मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आज रोजी ॲड. रेवण विश्वनाथ भोसले यांनी समाजवादी पार्टीतर्फे अर्ज दाखल केला. याप्रसंगी भूम, परंडा, वाशी तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज भरताना जिल्हाध्यक्ष शाहूराज खोसे, जयसिंग पवार, योगीराज साठे, प्रा. राहुल जगताप उपस्थित होते.